वर्ध्यात शेतीच्या वादातून एकाची हत्या, तीन जखमी
भूपेश बारंगे | वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याजवळील घोराड येथे शेतीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाची हत्या तर तीन जखमी झाले आहेत. एकास सावंगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणात विजय तेलरांधे ,नथ्थू तेलरांधे, दोन महिलासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोराड येथील दोन कुटुंबात किरकोळ स्वरूपाचा शेतीचा वाद होता. मृतक याचे वडीलांचे नावे असलेल्या शेतजमिनीवर आरोपी याचे आजोबाचे नाव कुळ म्हणून होते ते कमी करण्यासाठी मृतक याने तहसीलदार यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी आरोपी याचे आजोबाचे मृत्यूप्रमाणपत्राची मागणी मृतकाने त्यांचेकडे केली होती. ते आजोबाचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास आरोपीने नकार दिल्याने त्यांच्यात वाद विवाद झाल्याचे समजते. सदर प्रकरण हे आरोपी विजय यांच्या आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र मृतक यांनी 2 दिवसा अगोदर मागितले असता त्यांना देण्यास नकार दिला. परंतु मृतक यांनी आरोपी यांच्या घरी ६ ते ७ माणसे घेऊन घरी घुसून मारण्याचा प्रयत्न केला यातून हे हत्याकांड घडले अशी प्राथमिक माहिती आहे.
मृतक व्यक्ती याने सहा ते सात माणसे घेऊन आरोपी विजय यांच्या घरी जाऊन हमला केला असता त्यावेळी झालेल्या हाणामारीत विजय याने विळ्याने वार केल्याने वसंता हा गंभीर जखमी झाला. यावेळी परिसरातील लोक घटनास्थळाकडे धाव घेताच काहींनी तेथून पळ काढला. यात गंभीर जखमी झालेल्या वसंता यास रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच निधन झाले. या प्रकरणात विजय तेलरांधे ,नथ्थू तेलरांधे, दोन महिलासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपीने अटक केली असून मुख्य आरोपी विजय तेलरांधे आद्यपही फरार आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर,उपविभागीय पोलीसअधिकारी पियुष जगताप, ठाणेदार रवींद्र गायकवाड ,उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे दाखल झाले असून सेलू पोलीस तपास करत आहे. यातील आरोपी विजय तेलरांधे हा घटनेनंतर झालेल्या जोरदार पावसाचा फायदा घेत पसार झाला त्याचा पोलिस शोध घेत आहेत.