Medical Camp
ONGC-SPONSORED MEGA MEDICAL CAMP IN VERSOVA KOLIWADA BENEFITS 740 PATIENTS

ONGC Medical Camp: ONGCच्या सहकार्याने वेसावा कोळीवाड्यात वैद्यकीय शिबिर, 740 गरजू रुग्णांवर मोफत उपचार

ONGC: ONGCच्या सहकार्याने वेसावा कोळीवाड्यात भव्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

रविवार दिनांक २१/१२/२०२५ रोजी ONGC पुरुस्कृत व ONGC स्थानीय लोकाधिकार समिती उपाध्यक्ष, पंकज कोळी (शेट्टी) व सौ. सारिका लडगे यांच्या प्रयत्नांने भव्य वैद्यकीय शिबिर व ऑफशोअर संवेदीकरण कार्यक्रम डोंगरी गल्ली, वेसावा कोळीवाडा, अंधेरी, मुंबई येथे घेण्यात आला. सदर शिबीरात ७४० गरजू रुग्नांनी लाभ घेतला. पुरुष, महिला, मुल सर्व प्रकारची तपासणी झाली. तथा प्रत्येक रुग्नास औषध, चश्मा, जुट पिशवी, टी-शर्ट, टोपी भेट वस्तू वाटप करण्यात आली.

Medical Camp
Smartphone Ban: राजस्थानमधील 'या' गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरावर बंदी, जालोर पंचायतीचा आदेश

तथपूर्वी सकाळी १०.०० वाजता ONGC समूह महाप्रबंधक (उत्पादन) दिपक भटनागर यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळेस प्रमुख पाहूणे महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस किरण कोळी, रायगड जिल्हा अध्यक्ष अजय सोडेकर, प्रदीप टपके, नारायण कोळी, हरेश भानजी, गणेश वाधिकर इत्यादी उपस्थित होत. तर राजहंस टपके यांनी सूत्र संचालन केले.

ONGC तर्फे उत्तम व निटनेटके आयोजक पंकज कोळी (शेट्टी) त्यांनी आभार व्यक्त करताना ONGC समूह महाप्रबंधक (उत्पादन) दिपक भटनागर हे उत्तम प्रशासक तर आहेत. मच्छिमारांना ते मित्र समजतात. व त्यांच्या सहकार्यांने मेघा वैद्यकीय शिबीर होत आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती ने मोल्याचे सहकार्य केले असे सांगितले.

Medical Camp
Bangladesh Violence: बांगलादेशातील हिंसाचाराचे दिल्लीत पडसाद; उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलक आक्रमक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

डोंगरीकर तरुण मंडळ, डोंगरीकर महिला मंडळ, तुषार म. चिंचय, अलंकार भगत, सनी शेंडे, शिवा चिखले, सौ. उर्मिला चिंचय, सौ. कविता लडगे यांचे मोलाचे सहकार्य शिबीर यशस्वी पार पडले.

Summary
  • ONGC पुरस्कृत भव्य वैद्यकीय शिबिर वेसावा कोळीवाड्यात संपन्न

  • 740 पुरुष, महिला व मुलांना मोफत तपासणी व उपचार

  • औषधे, चष्मे व भेटवस्तूंचे मोफत वितरण

  • स्थानिक मंडळे व मच्छिमार संघटनांचे मोलाचे सहकार्य

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com