'त्या' ऑनलाईन गेमिंगच्या फसवणूक प्रकरणी आणखी 4 कोटींचे घबाड बाहेर...

'त्या' ऑनलाईन गेमिंगच्या फसवणूक प्रकरणी आणखी 4 कोटींचे घबाड बाहेर...

सोंटूच्या लॉकरमधुन ४.५४ कोटींचे घबाड पोलिसांकडून जप्त
Published by  :
Team Lokshahi

उदय चक्रधर, गोंदिया: ऑनलाइन गेमिंगच्या (Online Gaming) नावाखाली ५८ कोटींची फसवणूक करणारा बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्या लॉकरमधून गुन्हे शाखेने ४.५४ कोटींचा सोने-चांदीचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे सोंटूच्या बेनामी लॉकर्समध्येही कोट्यवधी रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांकडून त्याचे बेनामी लॉकर्स शोधण्यात येत आहेत. अधिकृत लॉकर्समधून रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, याअगोदर पोलिसांनी सोंटूच्या गोंदिया येथील घरातून १६.८९ कोटी रुपये रोख, १२ किलो ४०३ ग्रॅम सोने आणि २९४ किलो चांदी जप्त केली होती. त्याची किंमत २६.४० कोटी रुपये होती. आता लॉकरमध्ये सापडलेली रोकड आणि सोने-चांदीमुळे ही रक्कम ३० कोटी ९४ लाखांवर पोहोचली आहे. नागपूर पोलिसांच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्तीची ही पहिलीच वेळ आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com