Western Railway: बोरिवली-विरार सहाव्या मार्गिकेचा मार्ग होणार मोकळा

Western Railway: बोरिवली-विरार सहाव्या मार्गिकेचा मार्ग होणार मोकळा

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) तत्वत: मान्यता दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

Western Railway Borivali To Virar: पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) तत्वत: मान्यता दिली. 12.7808 हेक्टर खारफुटी जमिनी असून त्यावर रेल्वे कामे करण्यास मान्यता मिळाल्याने रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार आहे.वाढत्या गर्दीचा लोंढा विभाजित करण्यासाठी रेल्वे मार्गिका वाढवण्यावर भर दिला जात आहे.

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-3 अ) अंतर्गत पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान 26 किमीच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी 2184.02 कोटी रुपये मंजूर झाले असून डिसेंबर 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक्ष्य आहे. सध्या या प्रकल्पामधील बाधित झाडांची वृक्षतोड करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वृक्षतोडीचे प्रस्ताव आणि ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी यांना भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय प्रक्रिया केली जात आहे. तसेच पादचारी पूल, फलाटे व त्यावरील छताबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com