Maharashtra Assembly : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा विधानसभेत आक्रमक होत सभात्याग
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Assembly) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे. विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. यातच आता विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला असून याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या दालनात दुपारी 3 वाजता बैठक बोलावली आहे.
Summery
विधानसभेत शेतकरी प्रश्नावर विरोधक आक्रमक
शेतकरी प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी बोलावली बैठक
दुपारी 3 वाजता बोलावली बैठक
