Mangesh Kudalkar : सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण; मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mangesh Kudalkar) सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यवसायिक संकुल बांधणाऱ्या शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने धक्का दिला आहे.
आमदार कुडाळकर यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे एसीबीला आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
आमदार कुडाळकर यांच्यावर मतदारसंघात विकासकामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप रमेश बोरवा यांनी केला आहे.
Summery
सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरण
मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
कुडाळकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका
