Leopard Attack
Leopard Attack

Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश; बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर राज्य सरकारचा निर्णय

काही महिन्यांपासून शहरात बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Leopard Attack ) काही महिन्यांपासून शहरात बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर काल बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बिबट्याच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एकमधून शेड्यूल दोनमध्ये टाकण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासोबतच नरभक्षक ठरलेल्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशसुद्धा या बैठकीतून देण्यात आले आहेत.

Summery

  • बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्याचे पाहायला मिळत आहे

  • नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश

  • बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर राज्य सरकारचा निर्णय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com