Shivsena
Shivsena

Shivsena : मराठवाड्यातील शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल; पक्षबांधणी मजबूत करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Shivsena) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने मराठवाडा विभागात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

पक्षाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नेते, आमदार, खासदारांना जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. विलास पारकर, अर्जुन खोतकर, टी. पी. मुंडे, राजन साळवी, सिद्धराम म्हेत्रे यांसह अनेक अनुभवी नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रमुखांना निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात राहून पक्षबांधणी मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Summery

  • मराठवाड्यातील शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल

  • निवडणुकांसाठी अनुभवी नेते मैदानात

  • आमदार, खासदार जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com