धक्कादायक! दोन वर्षांत एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या, सहभागी डॉक्टरची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांनी दिले CID चौकशीचे आदेश

धक्कादायक! दोन वर्षांत एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या, सहभागी डॉक्टरची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांनी दिले CID चौकशीचे आदेश

राज्य सरकारने राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या गर्भलिंग चाचणी आणि भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीवर सोपविली आहे
Published by :
shweta walge
Published on

बंगळूर : राज्य सरकारने राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या गर्भलिंग चाचणी आणि भ्रूणहत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीवर सोपविली आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आदेश जारी केला आहे.

पोलिसांना म्हैसूरचे आयुर्वेदिक डॉ. चंदन बल्लाळ आणि त्यांच्या टीमने तीन महिन्यांत २४२ स्त्रीभ्रूण हत्या केल्याची कागदपत्रे, पुरावे सापडले आहेत. दोन वर्षांत एक हजाराहून अधिक भ्रूणहत्या झाल्याचं सांगितलं जातं आहे. निरीक्षक प्रशांत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उदयगिरी (म्हैसूर) येथील आयुर्वेदिक डे केअर सेंटरवर छापा टाकून रुग्णालयाला बंद करण्यात आलं आहे.

रुग्णालयाचे मालक डॉ. चंदन बल्लाळ यांनी मशिन्स वाताहात लावत कागदपत्रे नष्ट केली होती. त्यानंतर चंदनच्या घराची झडती घेतली असता रुग्णालयातील रजिस्ट्रर सापडले. ज्यामध्ये सर्व तपशील मिळाला. संघटित नेटवर्कद्वारे गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रुपये निश्चित केले होते. गुन्ह्यात सहभागी असलेले डॉ. चंदन बल्लाळ, डॉ. तुलसीराम, मीना, लॅब टेक्निशियन रिझमा, वीरेश यांच्यासह नऊ जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिद्धेशसह अन्य फरार आरोपींना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे.

धक्कादायक म्हणजे म्हैसूर येथील कोनसूर शासकीय रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर म्हणून कार्यरत काम करणारा डॉ. सतीश हा शुक्रवारी त्याच्या मोटारीमध्ये मृतावस्थेत आढळून आला. भ्रूणहत्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. भ्रूणहत्येचे प्रकरण उघडकीस येताच डॉ. सतीश हा फरार होता. पकडले जाण्याच्या भीतीने सतीशने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com