पद्मपुरस्कार हे काळ्या आईचं देण – पद्मश्री राहीबाई पोपेरे

पद्मपुरस्कार हे काळ्या आईचं देण – पद्मश्री राहीबाई पोपेरे

Published by :
Published on

कुणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ काळ्या मातीमुळेच भेटला. भारत सरकारनं दिलेल्या या पुरस्काराने माझं काम देशभरात जाईल अशी भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी शिर्डीत व्यक्त केली.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर बीजमाता राहीबाई पोपेरे शिर्डीत आल्या असता त्यांच्या हस्ते साईमंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वृक्षपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार मी काळ्या मातीला व शेतकऱ्याला समर्पित करते.बीज संकलनाचं हे कार्य देशभरात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचाव ही माझी इच्छा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या कामाचं कौतुक करत सीड बँकेला भेट देण्याचं मान्य केलं असंही राहीबाईंनी माध्यमांशी बोलतांना म्हणलं..डोंगरदर्यातील माझं काम बायफ संस्थेच्या माध्यमातूनच जगासमोर आलं असंही पोपेरे म्हणाल्या.यावेळी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com