पसरणी घाटामध्ये दरड कोसळली, वाहतूक धीम्या गतीने सुरू

पसरणी घाटामध्ये दरड कोसळली, वाहतूक धीम्या गतीने सुरू

Published by :
Published on

प्रशांत जगताप | सातारा | अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पावसाने काहीशी विश्राती घेतली असली तरी काही भागांत पाऊस सूरूच आहे. सातारा जिल्ह्यात पसरणी घाटात दरड कोसळली असून वाहतूक कोंडी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. बुधवारी दिवस आणि रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याने वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटामध्ये अतिवृष्टीने दरड कोसळली आहे. मांढरदेव घाटात देखील अवकाळी पावसाने दगड निसरटे होऊन दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पाचगणी रस्त्यावर दत्त मंदिराच्या बाजूला दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com