दारुड्या पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, काही तासातच आरोपी गजाआड

दारुड्या पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू, काही तासातच आरोपी गजाआड

दारुड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी दांड्याने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Published by :
shweta walge

दारुड्या पतीने किरकोळ कारणावरून पत्नीला लाकडी दांड्याने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मनिषा ज्ञानेश्वर प्रव्हाणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर घटना पैठण तालुक्यातील आपेगाव येथे घडली असून घटनेनंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना पैठण पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर भगवान प्रव्हाणे पाठलाग करुन गजाआड केले. या दुर्दैवी घटनेमुळे तीन चिमुकल्यांचे छत्र हरपल्याने गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहीती गावचे पोलीस पाटील संजय गडकर यांनी पोलीस दिली. पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, म्हस्के, पोलिस कॉस्टेबल,नरेंद्र अंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com