महाराष्ट्र
पालघर जिल्हा पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात
पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषण आणि बालमृत्यूचा विळखा अजूनही कायम आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच ४० बालमृत्यू तर ५ माता मृत्यूची नोंद झाल्याने प्रशासनाला जाग आलीय. कोरोना काळात ग्रामीण भागातील अंगणवाडी, ग्राम बाल विकास केंद्र आणि पालघर जिल्ह्यातील डगमगलेली आरोग्यव्यवस्था याकडे दुर्लक्ष झाल्याने या मृत्यु दरात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
मागीलवर्षी वर्षभरात जिल्ह्यात २९६ बालमृत्यू तर बारा माता मृत्यूची नोंद झाली होती. मात्र यावर्षी सुरुवातीलाच ही आकडेवारी वाढल्याने पालघर जिल्हा पुन्हा कुपोषण , बालमृत्यू आणि माता मृत्यू यांच्या विळख्यात सापडलेल्या पाहायला मिळतोय.