पश्चिम रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसेवेचा आजही खोळंबा

पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाल्याने पश्चिम रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसेवेचा आजही खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पालघर रेल्वे स्थानकाजवळ काल मालगाडीचा अपघात झाल्याने पश्चिम रेल्वेच्या डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसेवेचा आजही खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे. अप आणि डाऊन मार्गावरील डहाणूपर्यंतची उपनगरीय लोकल सेवा ठप्प झाली असून तर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत.

लोकल रद्द केल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांना डहाणू ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येत आहे. रेल्वेरूळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com