महाराष्ट्र
पंढरपुरात गोकुळाष्टमीनिमित्त फुलाफळांची आकर्षक आरास
पंढरपूर: श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विविध फळाफुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. या सजावटीमुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला, तसेच मंदिराला मनमोहक स्वरूप प्राप्त झालंय.
पुणे येथील भाविक श्री पांडूरंग रत्नाकर मोरे आणि श्री नानासाहेब बबन मोरे यांनी ही आरास श्री विठ्ठल रूक्मिणीच्या चरणी अर्पण केली आहे.
ऍथोरीयम,ऑर्केड, शेवंती, कामिनी, झेंडू, गुलाब असे फुलांचे प्रकार आणि अननस, कलिंगड ,सफरचंद,सिताफळ, मोसंबी, ड्रॅगन, संत्री या फ़ळांची तसेच विविध पानांची रंगसंगती वापरून ही आरास करण्यात आली आहे. या सजावटीसाठी २ हजार किलो फुले आणि ५०० किलो फळे वापरण्यात आली आहेत.