Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीचा सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
थोडक्यात
पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा
श्री. रामराव बसाजी वालेगावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेचा मान
(Pandharpur Kartiki Ekadashi) कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली.
मंदिराला रोषणाई करण्यात आली असून अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळाली. विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता संपन्न झाली.
कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या सजावटी साठी पाच टन देशी-विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही मोफत सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे.
या पूजेचे मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील पोटा गावातील श्री. रामराव बसाजी वालेगावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. त्यांना राज्य सरकार तर्फे मोफत प्रवासासाठी एसटीचा पास देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग चंद्रभागा नदी वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी जमली आहे
