Pankaja Munde
Pankaja Mundeteam lokshahi

Pankaja Munde : मला विधानपरिषदेची उमेदवारी..., विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार
Published by :
Shweta Chavan-Zagade

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज (3 मे ) आठवा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून शुक्रवारी गोपीनाथ गडावरून विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून काय बोलणार, याची उत्सुकात सर्वांना लागली आहे. यापूर्वी पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Vidhan Parishad Election 2022)

मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे. हीच माझी शक्ती आहे. आता पक्ष याबाबत लवकरच निर्णय घेईल. घोडामैदान फार लांब नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. गोपीनाथ मुंडे यांनीही जे जे पद भुषवले, ते आपल्या कर्तृत्त्वाने मोठे करून दाखवले. त्यामुळे आमच्यावर 'चिंधीचं सोनं करावं', हे संस्कार झाले आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde
Raj Thackeray | मनसे कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, भोंग्याच्या मुद्द्यावर वाटणार होते पत्रक

पंकजा मुंडे काय बोलणार?

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली. यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्या. गोपीनाथ गडावरुन आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार का याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

Pankaja Munde
Rajyasabha Election 2022 : मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने त्यांचे पुनर्वसन करावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांना विधानपरिषद भेटली नाही. आता राज्यसभा आणि विधानपरिष अशा दोन्ही निवडणुका एकापाठोपाठ पार पडत आहे. या वेळी तर पंकजा यांना दोन्हीपैकी एक पक्ष काहीतरी देतो का? याबाबत उत्सुकता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com