पंकजा मुंडेना परळीत मोठा धक्का; बड्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंकजा मुंडेना परळीत मोठा धक्का; बड्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published by :
Published on

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना परळी तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. कारण परळीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित होते.

आज या प्रवेशामुळे संघटनेला आणि आम्हाला बळ मिळणार आहे. सर्वांचे स्वागत,' अशी प्रतिक्रिया या प्रवेश सोहळ्यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, "२०१२ झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माझा दारुण पराभव झाला. आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट कमिटी आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मातीतल्या माणसांनी मला पाठिंबा दिल्यामुळेच हे यश मिळवता आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com