पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेत चोरांचा सुळसुळाट; तब्बल 'इतके' तोळे सोने लंपास

पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेत चोरांचा सुळसुळाट; तब्बल 'इतके' तोळे सोने लंपास

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज सातारा जिल्ह्यात होती.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सातारा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज सातारा जिल्ह्यात होती. फलटण शहरामध्ये यात्रेचे आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. परंतु, या यात्रेत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेत तब्बल 15 तोळ्यांच्या सोन्याची चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे यात्रेमुळे पोलिसांचा शहरात मोठा फौजफाटा तैनात होता.

पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेत चोरांचा सुळसुळाट; तब्बल 'इतके' तोळे सोने लंपास
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेणार? म्हणाले, उद्या...

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण शहरात आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी पंधरा तोळे सोने लंपास केले आहे. यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com