Parth Pawar : वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात
थोडक्यात
कोरेगाव पार्कमधील जमीन गैर व्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली
कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट
वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात
(Parth Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पार्थ पवार यांचं नावं वगळून अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याची माहिती मिळत आहे.
वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमिडीया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा असून जिजाई बंगला हा निवासी भागात आहे त्यामुळे या बंगल्यात कंपनीचे कार्यालय कसे काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे आता पार्थ पवारांचा कंपनीचा पत्त्यावरूनही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
