Parth Pawar : पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार; बनावट स्वाक्षरीसह बनावट कागदपत्रे प्रसारित केल्याचा दावा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Parth Pawar) पार्थ पवार यांच्याकडून अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार करण्यात आली आहे. पार्थ पवारांनी केलेल्या अर्ज आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पाहणार असून काल पार्थ पवार यांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.
ही तक्रार पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे सादर करण्यात आली असून आज ते अर्ज बघणार आहेत काही समाजकंटकांनी त्यांच्या बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा दावा पार्थ पवार यांनी केला आहे.
पार्थ पवार यांनी या गुन्ह्यासाठी आणि गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई सुरू करत असल्याचे सांगितले आहे.
Summery
पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तींविरुद्ध लेखी तक्रार
बनावट स्वाक्षरीसह बनावट कागदपत्रे प्रसारित केल्याचा दावा
पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त आज अर्ज पाहणार
