वरंधा घाटात मोठा अपघात; प्रवासी बस साठ फूट दरीत कोसळली

वरंधा घाटात मोठा अपघात; प्रवासी बस साठ फूट दरीत कोसळली

भोरजवळील वरंधा घाटात मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर साठ फूट दरीत कोसळली आहे
Published on

पुणे : भोरजवळील वरंधा घाटात मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर साठ फूट दरीत कोसळली आहे. यात एकूण 13 प्रवासी असल्याची माहिती समजत आहे.

वरंधा घाटात मोठा अपघात; प्रवासी बस साठ फूट दरीत कोसळली
सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा; ...तर मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालू

माहितीनुसार, स्वारगेटवरून भोर मार्गे टेम्पो ट्रॅव्हलर चिपळूणकडे निघाला होता. मात्र, वाहनावरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने भोर जवळील वरंधा घाटात टेम्पो ट्रॅव्हलर साठ फूट दरीत कोसळली आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. यामध्ये 10 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com