Igatpuri ; रेल्वे स्थानकावर गोंधळ, तब्बल दीड तास एक्सप्रेस थांबवली, प्रवासी संतप्त

Igatpuri ; रेल्वे स्थानकावर गोंधळ, तब्बल दीड तास एक्सप्रेस थांबवली, प्रवासी संतप्त

इगतपुरी रेल्वे स्थानकावर दीड तास एक्सप्रेस थांबवली, संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Published by :
shweta walge
Published on

इगतपुरी स्थानकात एक गोंधळ घडला आहे. लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी तब्बल दीड तास इगतपुरी स्थानकात उभी करून ठेवल्याने ट्रेन मधील प्रवासी संतापले आहेत. संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गोंधळ घातला आहे. या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

इगतपुरी स्थानकावर एक्सप्रेसमधील काही संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे. लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस इगतपुरी स्थानकावर थांबल्यानं प्रवाशांना राग अनावर झाला. तब्बल दीड तास एक्सप्रेस स्थानकावर थांबली होती. त्या मागून आलेल्या गाड्या सोडल्याने प्रवाशांना संताप अनावर आला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात गाडी तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला. गाडी थांबवून ठेवण्याचे कोणतेही कारण प्रशासनाकडे नसल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले. अखेर पावणे दोन तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com