Raj Thackeray : राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली.
राज ठाकरे आणि मनसेकडून वारंवार उत्तर भारतीय नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात द्वेषपूर्ण विधाने केली जातात. निवडणुकीच्या वेळी असे प्रकार वाढतात. हिंदी भाषेचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला असून घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविरोधात कथित 'द्वेषयुक्त भाषण' प्रकरणी एफआयआर नोंदवण्याची आणि पक्षाची नोंदणी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दोन्ही यंत्रणांना चार आठवड्यांच्या आत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
पक्षाविरोधात कथित 'द्वेषयुक्त भाषण' प्रकरणी एफआयआरची मागणी
