घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

घाटकोपरमध्ये बचावकार्यादरम्यान होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना पेट्रोल पंपाला आग

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
Published by :
Siddhi Naringrekar

स्वप्निल जाधव, मुंबई

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू 88 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. होर्डींगखाली अजुनही 30 ते 40 जण अडकल्याची माहीती मिळत आहे. यातच आता बचावकार्यादरम्यान पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना घडली आहे.

होर्डिंगचा लोखंडी सांगडा उचलताना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आता आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. आग लागल्यामुळे अग्निशमन दलाकडून पाण्याचे फवारे मारण्यात आले. दुर्घटनेला 40 तास उलटूनही अद्याप बचावकार्य सुरूच आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com