Pik Vima Yojana
Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीक विमा योजनेची मुदत'या'तारखेपर्यंत वाढवली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान पीक विमा सुधारित योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pik Vima Yojana) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान पीक विमा सुधारित योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आता शेतकऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.

कर्जदार शेतकरी 30 ऑगस्टपर्यंत आणि बिगर कर्जदार शेतकरी 14 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकतील.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालू खरीप हंगामासाठी ही योजना सुरू आहे. अर्ज प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार ही विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी उपलब्ध मार्ग

अधिकृत पोर्टल: pmfby.gov.in

बँक शाखा किंवा विमा प्रतिनिधी

क्रॉप इन्शुरन्स मोबाईल अॅप

सीएससी (Common Service Centre)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com