Pipani Symbol
Pipani Symbol

Pipani Symbol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळलं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...

(Pipani Symbol) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पिपाणी हे चिन्ह वगळण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत तुतारी ऐवजी पिपाणीला मते गेली तर विधानसभा निवडणुकीत देखील यामुळेच उमेदवार पडले असल्याची दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पिपाणी हे चिन्ह गोठवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली आणि आयोगाने आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळून टाकण्यात आले आहे. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ नाव होते.

यामुळे नाम साधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र आता हे चिन्ह वगळण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे

Summery

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळलं

  • तुतारी वाजवणा-या माणसाशी साध्यर्म्य असणा-या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं घेतला होता आक्षेप

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com