avinash jadhav
महाराष्ट्र
Avinash Jadhav : मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधव यांना घेतलं ताब्यात
मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती.
(Avinash Jadhav) मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
आता याच पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. मात्र त्याआधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. पहाटे 3 वाजता अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. काशिमिरा पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलं आहे.