ShivSenaTeam Lokshahi
महाराष्ट्र
शिवसेनेच्या मातोश्री ते शिवाजी पार्क वारीची पोलिसांनी नाकारली परवानगी
कायदा सुव्यवस्थेचं कारण देत ही पोलिसांनी नाकारली परवानगी आहे.
मुंबईत उद्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्यासोबतच दोन्ही गटाकडून या मेळाव्यांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. अशातच उद्या शिवसेनेच्या वतीने मातोश्री ते शिवाजी पार्क वारी निघणार होती. त्यासाठी शिवसेनेने पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, त्या वारीची परवानगी आता मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण देत ही पोलिसांनी नाकारली परवानगी आहे.