Maharashtra Pollution
Maharashtra Pollution

Maharashtra Pollution : राज्यातील प्रमुख शहरांवर प्रदूषणाचे सावट; हवेची गुणवत्ता घसरली

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यातील शहरी भागांमध्ये प्रदूषणाचा कहर

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके उडवले जातात

  • महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक

(Maharashtra Pollution ) राज्यातील शहरी भागांमध्ये प्रदूषणाचा कहर पाहायला मिळतो आहे. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके उडवले जातात. यामुळे प्रदूषण पसरते. प्रदूषणामुळे अनेक आजार होतात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक झाली आहे. यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक दुपारी 305वर पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई, पुणे नागपूरसह प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. वाढत्या वायु प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खराब नोंदवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com