Poonam Mahajan : भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Poonam Mahajan)आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. आता 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली असून वसई-विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Summary
पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात
भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांच्यावर नवी जबाबदारी
वसई-विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती
