Kolhapur : कोल्हापूर पालिकेसाठी उद्यापासून 2 दिवस पोस्टल मतदान; 800 हून अधिक कर्मचारी बजावणार मतदानाचा हक्क
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolhapur) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच कोल्हापूर पालिकेसाठी उद्यापासून 2 दिवस पोस्टल मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या महापालिका हद्दीतील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून पोस्टल मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
शनिवार व रविवार असे दोन दिवस हे मतदान होणार आहे. कर्मचाऱ्यांकरिता शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येणार आली असून 800 हून अधिक कर्मचारी मतदानाचा हक्क बजावतील.
Summary
कोल्हापूर मनपालिकेसाठी पोस्टल मतदान उद्यापासून
शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदान होणार
800 हून अधिक कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार
