महाराष्ट्र
Antilia Explosive Case : प्रदीप शर्माला 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं हा निर्णय दिला.
अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
प्रदीप शर्मा यांचा विशिष्ट करागृहात पाठवण्यासाठी एनआयए कोर्टापुढे अर्ज सादर केला. तुरुंग प्रशासनानं अर्जाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत एनआयएची चौकशी तूर्तास पूर्ण झाल्याचं स्पष्ट आहे.