Pradnya Satav
Pradnya Satav

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश

भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Pradnya Satav) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार प्रज्ञा सातव यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता प्रज्ञा सातव यांनी विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असून सभापती राम शिंदे मुंबईत नसल्याने सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

Summery

  • प्रज्ञा सातव यांचा विधानभवन सचिवांकडे राजीनामा

  • सभापती राम शिंदे मुंबईत नसल्याने सचिवांकडे राजीनामा सुपूर्द

  • प्रज्ञा सातव आज भाजपात प्रवेश करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com