Prakash Mahajan
PRAKASH MAHAJAN CRITICIZES THACKERAY BROTHERS, QUESTIONS THEIR POLITICAL STRATEGY

Prakash Mahajan : 'अस्तित्व टिकवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न'...प्रकाश महाजन यांची ठाकरे बंधूंवर टीका

Thackeray Brothers: प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. त्यांनी ठाकरे बंधूंना अस्तित्व टिकवण्याचा ढोंग करत असल्याचा आरोप करत भ्रष्टाचार, नेपोटिझम आणि विकास कामांवर प्रश्न उपस्थित केले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मला जे ट्रोल करत आहेत त्यांची स्वतःचीच लंगोटी फाटलेली आहे. आज मी संजय राऊत यांना काही प्रश्न विचारणार आहे. काल संजय राऊत आणि ५० खोके हा जो विषय काढला. पण मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक जे फोडण्यात आले ते किती पैशावर फोडले. ते कोणत्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर कडून घेतले हे सर्जेराव त्यांनी जाहीर करावं. 2019 मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणि काँग्रेसकडून सेंटर व त्यांनी किती दलाली घेतली? ती कोण महिला ज्यांनी संजय राऊत यांचे कॉलर धरली. संजय राऊत हे खासदार आहेत त्यांनी केलेली पाच काम मला दाखवावीत असं प्रकाश महाजन म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी बीडहून तिरुपती बालाजीला पाई चालला होता. कर्नाटकला गेल्यानंतर या प्रवासात त्या तरुणाचं दुःखद निधन झालं. त्या चिंतामण रुईकरची भेट उद्धव ठाकरे यांनी कधीच घेतली नाही पण त्याच्या विधवा पत्नी आणि मुलांना चार खोल्यांचे घर एकनाथ शिंदे यांनी बांधून दिलं हा फरक उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे.

माहितीतील तीनही भाऊ एकत्र आहेत. एखाद्याने भावनांच्या बऱ्याच घोषणा दिली तर त्याला समजून सांगितलं जाईल जाईल. यांनी महायोजित कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना यांच्या हातात गेली तर शिवसेना भवनाचा मॉल होईल अशी मला भीती आहे. मुंबई गुजरातला भेटणार हे गेल्या 30 वर्ष हेच राजकारण करत आहेत. ते स्वतः गुजरातला भेट द्यायला गेले होते गुजरातवर तर राज ठाकरे यांचा प्रेम सर्वांना माहीत आहे.

आता दोन नवीन राजपुत्र आलेत त्यातला एक म्हणतात की प्रत्येक दोन किलोमीटरवर संडास करेन किंवा बांधणी याबाबत मला माहित नाही पण दुसरे बोलता बोलता ब्लॅंक होऊन जातात. आपला अस्तित्व टिकवण्यासाठी संदीप देशपांडे यांच्यासारखे निष्ठावंत ना पायाखाली घालण्यात आलं. युती केल्यानंतर शंभर एक जागा आपल्याला लढवायला मिळेल असं कार्यकर्त्यांना वाटलं. कुटुंब म्हणून त्यांना आपलं अस्तित्व यांना टिकवायचं आहे मराठी वगैरे हे सगळं त्यांचं ढोंग आहे अशी टीका प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com