Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

(Pravin Gaikwad) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना अटक करण्यात आली आहे.

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला गेला आहे. आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप करत आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. काही संघटना आणि राजकीय नेत्यांनीही या प्रकरणात गंभीर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com