ईडा, पीडा जाऊ दे, कोरोनाचे संकट टळू दे महिलांची वडाला प्रार्थना

ईडा, पीडा जाऊ दे, कोरोनाचे संकट टळू दे महिलांची वडाला प्रार्थना

Published by :
Published on

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, पती पत्नीचे नातेसंबंध दृढ व्हावे, पतीदेवाला बदीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

आज नाशिकच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी महिलांनी वट वृक्षाचे पूजन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी खबरदारी घेत मास्कचे परिधान करत वटवृक्षाचे पूजन केले. पती पत्नीचे नातेसंबंध दृढ व्हावे हि या सणामागील संकल्पना आहेच. पण त्याचबरोबर वटपौर्णिमेचा खरा संदेश म्हणजे वडाची पुजा यासाठी आहे की या विचारातुन वृक्ष संवर्धन व्हावे व पर्यायाने पर्यावरण जोपासत असताना निर्सगाचा समतोल राखला जावा असे आवाहन लोकशाही न्यूज आमच्या प्रेक्षकांना करीत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com