महाराष्ट्र
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई व नवी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई व नवी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.
त्यानंतर महायुतीच्या सर्व आमदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचे आहे.
त्यानंतर खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 9 एकरात पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर असून या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.