Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; वर्षा गायकवाड म्हणाल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई आणि पालघरमध्ये नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भुमिपूजन होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील जो पुतळा आहे तो कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत. बीकेसीमध्ये येणार आहेत. त्यांनी मागेसुद्धा जलपूजन केलं होते की, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्याठिकाणी पुतळा बसवणार आहे. त्याचे अजून काम सुरु झालेलं नाही.
यासोबतच ते म्हणाले की, आम्ही बीकेसीला जाऊन काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माझ्याबरोबर उपस्थित राहतील. आम्ही त्याठिकाणी जाऊन देशाचं पंतप्रधानांना भेटू आणि त्यांना प्रश्न विचारु की अशातऱ्हेने निकृष्ठ दर्जाचे काम झालेलं आहे त्याची चौकशी होणार आहे की नाही? आणि ते जाहीर माफी मागणार आहेत की नाही? असे वर्षा गायकवाड म्हणाले.