पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा;  मुरलीधर मोहोळ म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा आहे. याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणेकरांमध्ये एक उत्सुकता आहे की आज मोदीजींना प्रत्यक्ष पाहता येणार आहे, ऐकता येणार आहे. तो अनुभव घ्यायचा आहे. मोठ्या संख्येनं पुणेकर आज रेसकोर्स मैदानावर एकत्र येतील.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जवळपास 2 लाख लोक येतील असा आमचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आमची खूप चांगली तयारी झाली आहे. एक आनंद असतो की मोदीजींबरोबर काही काळ घालवायला मिळणं, त्यांचा सहवास मिळणं. हा आयुष्यातला खूप वेगळा अनुभव असतो. मला तो आज पुन्हा घेता येणार आहे. त्यामुळे मी ही उत्सुक आहे. मला असं वाटतं की, आज पुण्यात सगळीकडे त्यांचे खूप चांगल्याप्रकारे स्वागत होणार आहे. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com