PM Narendra Modi : महापालिका निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(PM Narendra Modi ) महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. २९ पैकी ९ महापालिका भाजपने स्वबळावर जिंकल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "महाराष्ट्राचे आभार !राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Summary
महापालिका निकालावर पंतप्रधान मोदींचं ट्वीट
महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ
हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा
