PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'या' तारखेला गोवा दौरा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवाच्या दौऱ्यावर येणार आहेत. 28 तारखेला पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा असणार असून पर्तगाळ काणकोण येथील श्री जिवोत्तम मठाच्या श्री प्रभू रामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यासाठी येणार आहेत.
पंतप्रधान दुपारी तीन वाजता पोहोचतील. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी -काणकोण जिवोत्तम मठाच्या ५५०व्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम येथे हाती घेतले आहेत. २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यत विविध कार्यक्रम होणार आहेत.
२८ तारखेला श्रीमद विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामींच्या उपस्थितीत पंतप्रधान या मूर्तीचे अनावरण करणार असून थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंगचेही उद्घाटन होणार आहे. ७७ फूट उंच प्रभू श्री रामचंद्रांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी करतील. हा पुतळा मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनानिमित्त उभारण्यात आला आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
Summery
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २८ नोव्हेंबरला गोवा दौरा
गोव्यात होणार प्रभु श्रीरामाच्या पुतळ्याच अनावरण
७७ फूट उंच प्रभू श्री रामचंद्रांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी करतील
