PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश काढले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 223 नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोतून प्रवास करणार असल्याची माहिती मिळत आहे. 26 सप्टेंबरला सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून प्रवास करणार असून पंतप्रधान स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.