Nagpur : नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून सुरक्षारक्षकांच्या गेटची तोडफोड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur) नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून सुरक्षारक्षकांच्या गेटची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दिल्ली येथील प्रिंस लक्ष्मण गोयलचंद्र या कैद्याने नागपूर कारागृहात राडा घातला असून नागपूर हिॅगणा पोलिसांनी त्याला हत्येच्या प्रयत्नांच्या आरोपात अटक केली होती.
तेव्हापासून तो कारागृहात आहे. या कैद्याने कर्मचाऱ्यांकडे औषध मागीतले, पण डॅाक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध देणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तोडफोड केली.
पोलीस स्टेशनमध्ये सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Summary
नागपुरात मध्यवर्ती कारागृहात गेटची तोडफोड
कैद्यांकडून सुरक्षारक्षकांच्या गेटची तोडफोड
लक्ष्मण गोयलचंद्र कैद्याचा कारागृहात राडा
