वर्ध्यातील कारंजात प्रकल्पग्रस्तांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

वर्ध्यातील कारंजात प्रकल्पग्रस्तांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

अमरावती येथून नागपूर अधिवेशनाकडे निघालेल्या प्रकल्प ग्रस्तांनी वर्ध्यातील कारंजा शहराजवळील नाराफाट्याजवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
Published by :
shweta walge

भूपेश बारंगे,वर्धा: अमरावती येथून नागपूर अधिवेशनाकडे निघालेल्या प्रकल्प ग्रस्तांनी वर्ध्यातील कारंजा शहराजवळील नाराफाट्याजवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मोर्चेकरांनी बाजूला सारून ताफा सोडण्यात आला.

अमरावती येथून नागपूर येथे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी निघालेल्या शेतकरी लॉंग मार्चमधील आंदोलकांनी आज सायंकाळच्या सुमारास अमरावती येथील नागपूरकडे जात असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ताफा काही काळ थांबला. प्रकल्पग्रस्त अमरावती नागपूर महामार्ग ताफा अडवून महामार्गावर बसण्याचा प्रयन्त करून ताफा पुढे न जाऊ देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी प्रकल्प ग्रस्तना बाजूला सारून ताफा जाण्यासाठी मार्ग मोकळा केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण दिसत होते. पोलिसांनी ताफ्याच्या समोर आलेल्या प्रकल्प ग्रस्तना बाजूला करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांना पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ

अमरावती येथून नागपूर कडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जात असताना कारंजा शहराजवळ त्यांचा अधिवेशनात जात असलेल्या प्रकल्प ग्रस्त आंदोलकांनी ताफा अडविण्यात आला.मात्र यावेळी प्रकल्प ग्रस्तांशी सवांद न साधता उपमुख्यमंत्री अजित पवार येथून निघून गेल्याने प्रकल्प ग्रस्तांनी महामार्गवर जोरदार घोषणाबाजी करत प्रकल्प ग्रस्त संतप्त झालेले पाहायला मिळाले.

हे सरकार शेतकऱ्याबाबत संवेदनशील नाहीच

अमरावती कडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर ला जात असताना आम्ही त्याचा ताफा अडविला.आमच्या मागण्या सोडवण्यात यावे अशी मागणी आमची असताना त्यांनी आमच्याशी हितगुज करायला पाहिजे होते मात्र ते आमच्या सोबत न बोलता निघून गेल्याने हे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही असा आरोप प्रकल्प ग्रस्त अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com