महाराष्ट्र
थकीत वेतनासाठी महिलांचे आंदोलन… अमित देशमुख, विजय वडेट्टीवारांचा काढता पाय
चंद्रपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत थकीत वेतनासाठी कंत्राटी महिलांनी आंदोलन केलंय. यावेळी मंत्री अमित देशमुख आणि विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मात्र, आंदोलनकर्त्या महिलांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर मंत्री महोदयांनी काढता पाय घेतल्याचं चित्र होतं.
पत्रकार परिषद संपल्यावर नियोजन भवनात आधीच येऊन बसलेल्या 2 आंदोलक महिलांनी ओरडून त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मागील 77 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी मुलाबाळांसोबत आंदोलन करत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. अशा वेळी जगण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याचं महिलांनी सांगितलं. मात्र मंत्री देशमुख यांनी या आंदोलनावर भाष्य करताना कोविड काळात हे आंदोलन कसे करू शकता? असा उलटा विचारला.