Melghat
महाराष्ट्र
Melghat : 'मेळघाटला आठवडाभरात बालरोग, प्रसुतीतज्ज्ञ द्या'; उच्च न्यायालयाने दिले सरकारला आदेश
'मेळघाटला आठवडाभरात बालरोग, प्रसुतीतज्ज्ञ द्या' असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Melghat) 'मेळघाटला आठवडाभरात बालरोग, प्रसुतीतज्ज्ञ द्या' असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, 'खोज'चे ॲड. बंड्या साने आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश देण्यात आले.
न्यायालयाने राज्य सरकारला आठवडाभरात एक बालरोगतज्ज्ञ आणि एक प्रसुतीतज्ज्ञ अमरावतीच्या मेळघाटमध्ये नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अहवालावर काही मुद्दे मांडायचे असल्यास ते पुढील सुनावणीदरम्यान सादर करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
'मेळघाटला आठवडाभरात बालरोग, प्रसुतीतज्ज्ञ द्या'
उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
जनहित याचिकेची पुढील सुनावणी 16 जानेवारीला
