Koyna Dam : कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी 862 कोटी 29 लाख रूपयांची तरतूद
(Koyna Dam ) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोयना धरण पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली असून या जलविद्युत प्रकल्पासाठी 862 कोटी 29 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोयना धरण पायथा विद्युतगृहसाठी मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वीजनिर्मितीचे धोरण हे महत्वाचे उद्दिष्ट असून या प्रकल्पाद्वारे ८० मेगावॅट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. हा प्रकल्प कोयना धरणाच्या पायथ्याशी उभारला जाणार असून या धरणाच्या डाव्या तीरावर ही वीजनिर्मितीची प्रक्रिया केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ आणि महानिर्मिती कंपनी यांच्यासोबत करार केला आहे. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचनयोजना (ताकारी-म्हैसाळ) या योजनांसाठी 20 टीएमसी पाणी विद्युतनिर्मिती करून सोडले जाणार आहे.