महाराष्ट्र
Pune Koyata Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, भर चौकात गाव गुंडाने हवेत फिरवला कोयता
पुण्यातील धायरी परिसरातला व्हिडिओ समोर
(Pune Koyata Gang) पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. भर चौकात गाव गुंडाने हवेत कोयता फिरवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील धायरी परिसरातला हा व्हि़डिओ असून धायरी गावात तीन तरुणांनी कारच्या बोनेटवर चढून कोयता दाखवून दहशत माजवली होती.
या प्रकरणी नागरिकांकडून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींची गावभर धिंड काढली. पुण्यातील धायरी परिसरातील या धक्कादायक व्हिडिओमुळे परिसरात भितीने वातावरण पसरले आहे.