Pune Land Scam : पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण; शीतल तेजवाणीसह चौघांना नोटीस
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Land Scam ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्राइजेस कंपनीने 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच आता पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवाणीसह चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्या प्रकरणी शीतल तेजवाणी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे यांच्यासह चौघांना पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.
मुंढवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल असून बोपोडी प्रकरणात गवंडेसह इतरांवर गुन्हा नोंद असून या प्रकरणांचा तपास खडक पोलीस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या चौघांना चौकशीला हजर राहण्याची पोलिसांनी नोटीस दिली आहे.
Summery
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण
शीतल तेजवाणीसह चौघांना नोटीस
चौकशीला हजर राहण्याची पोलिसांची नोटीस
